भक्तांनकडून श्री प्रभुंची सेवा

मुसलमानी आमदानीत स.न. १६०० च्या शतकामध्ये गुलछनाबाद ऊर्फ नासिक येथील चार बिघे पंचवटीची जागा कै. मल्हार धोंडो प्रभु उर्फ पुजाधिकारी / पुजारी यांना इनाम मिळालेला आहे. इ.स.१७४३-४४ सालांत कै. बालाजी बाजीराव पेशवे ऊर्फ नानासाहेब पेशवे (पेशवेपद इ.स. १७४०-१७६१) ह्यांनी श्रीरामनवमीचे उत्सव खर्चाचे बेगमीस मौजे शिंगवे बहुला हा संपूर्ण गाव (मोकासा अमळाखेरीज) व नंदादिपाचे खर्चास मौजे सातुली गावचा मोकासा अंमल कै. भिंकभट बाबाभट प्रभु ऊर्फ पुजाधिकारी / पुजारी ह्यांना इनाम करून सनद दिलेली आहे. इ.स.१७६८ सालात पुजेच्या वृत्तीचे निवडपत्र कै. रघुनाथ बाजीराव पेशवे ( पेशवेपद १७७३) ह्यांनी कै. मल्हारभट भिंकभट प्रभु उर्फ पुजाधिकारी / पुजारी ह्यांना करून दिलेली आहे. इ.स.१७८५ साली कै. सवाई माधवराव पेशवे (पेशवेपद १७७४-१७९५) नाशिक मुक्कामी खास दर्शनासाठी आले होते. येथे आल्यावर देवतेची यथासांग पुजाकरून देवतेस दाग दागिने अर्पण केलेले आहेत. शिवाय चैत्र उत्सवातील श्री रामचंद्रचे रथयात्रेसाठी नविन रथ व त्याचे खर्चासाठी सालीना दोनशे रूपयाची सनद सरदार कै. रास्ते यांना करून दिलेली आहे. इ.स. १७९९ साली कै. अमृत रघुनाथराव उर्फ दुसरे बाजीराव पेशवे ( पेशवेपद इ.स.१७९६-१८१८) ह्यांनी हलगड किल्यांतील शिलकी अंमल सालीना इ.स.१२९६ श्री रामचंद्रांचे त्रिकाल चौघड्यांचे खर्चास लावून कै. सयाजी व नानाजी बल्द देवजी न्हावी ह्यांना सनद लिहून देऊन इ.स.१७९९ पासून श्री रामचंद्राचे पुढे त्रिकाल चौघडा सुरू केलेला आहे. तसेच इतरही अनेक भक्तांनी वेळोवेळी यथाशक्ती या यथामती उत्तमे श्री रामचंद्राचे पुजा - अर्चा नैवद्य, नंदादिप श्री रामजन्मोत्सवादी खर्चास वेळोवेळी देऊन पुजाधिकारी / पुजारी घराण्यांतील इसमांना सनदा व कागदपत्रे करून दिलेली आहेत.

ऑनलाईन दर्शन

मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम

दैनंदिन कार्यक्रमांचे वेळापत्रक

 • पहाटे
  ५:३० ते ६:३० श्रींची काकडआरती
 • सकाळी
  ७:०० ते ८:०० सनई वादन व भुपाळी
 • सकाळी
  ८:०० ते १०:०० श्रींची मंगल आरती
 • सकाळी
  १०:३० ते १:०० श्रींची महापुजा महान्यास, महाआरती
 • दुपारी
  ३:०० ते ५:०० विविध भजनी मंडळाचे भजन
 • सांयकाळी
  ७:०० ते ८:०० श्रींची शेजआरती
 • रात्री
  ८:०० ते १०:०० किर्तन