नुतनीकरण

साधारणता सन १७७८ साली पुजाधिकारी पुजारी परिवाराने पुढाकार घेऊन श्री राम याग समिती स्थापणा केली सन १९७८ साली नाशिकमध्ये व श्री काळाराम मंदिरामध्ये प्रथमच भव्य प्रमाणावर श्रीराम याग केला सदर कार्यक्रमास न्यायमूर्ती राकम केशव राणडे याचा व्याख्यानाचा कार्यक्रम प्रामुख्याने होता. भाविकांचा खुपच मोठा सहभाग मिळाला संपूर्ण वातावरण राममय झाले त्यातून स्फर्ती घेऊन पुजाधिकारी पुजारी परिवारने स्वतः इतर भाविकांनकडून आगदी एक एक रूपया देनगी जमवून श्रीच्या प्रभावली भोवतालच्या चांदीच्या महिरापा चांदिचा दरवाजा यांचे चांदिच्या पत्र्याने मढवून नुतनीकरण केले. तसेच नविन पालखी तयार करून तिही चांदीच्या पत्र्याने पढवली आहे. अंदाजे ४० किलो चांदीचे काम करण्यात त्यासाठी गुजरातहून कुशल कारागिर पाचारण करण्यात आले होते.

श्री काळाराम संस्थान विश्र्वस्त मंडळ हे मंदिराचे व्यवस्थापण व जिर्नोध्दार उत्तम त-हेने सांभाळीत आहे. त्यामुळे मंदिराचे नाजुक नक्षीकाम आज दोनशे वर्षे हुवून गेली तरी आपण अगदी नव्यासारखे पाहूशकतो. ह्या जिर्नोध्दारास अंदाजे पावणे दोन कोटी रूपये खर्च आला आहे.

पंचवटी निवासी श्री रामचंद्रांचा ध्यान मंत
ध्यायेत अजानबाहु धृतशरधनुषं पूर्वकाष्टा भिवत्र |
तिष्ठतं पंचवट्याम कृतहद्यकरे गौतमी वामती रे ||
सीतायस्यास्ति वामे चमर धृत करो लक्ष्मणो दक्षिणेच |
वासोलंकार दीप्तं पवनसुत युतं सुंदर शामरामम् ||१||

ऑनलाईन दर्शन

मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम

दैनंदिन कार्यक्रमांचे वेळापत्रक

 • पहाटे
  ५:३० ते ६:३० श्रींची काकडआरती
 • सकाळी
  ७:०० ते ८:०० सनई वादन व भुपाळी
 • सकाळी
  ८:०० ते १०:०० श्रींची मंगल आरती
 • सकाळी
  १०:३० ते १:०० श्रींची महापुजा महान्यास, महाआरती
 • दुपारी
  ३:०० ते ५:०० विविध भजनी मंडळाचे भजन
 • सांयकाळी
  ७:०० ते ८:०० श्रींची शेजआरती
 • रात्री
  ८:०० ते १०:०० किर्तन