रथयात्रा

Rathyatraचैत्र शु ||११|| एकासशि हा दिवस नाशिक करांच्या दृष्टीने अतिशय भाग्याचा कोणासही हेवा वाटावा असा कारण या दिवशी श्री प्रभु रामचंद्र रथारूढ होउन नगर प्रसक्षीणा करीतात व भाविकांना दर्शन देतात .

या दिवशी जरी एकादशी असली तरी प्रभुस स्नानादी उपचार केले जात नाही कारण श्रीराम नवमिस स्नानादी उपचार झालेले असतात. माध्यान्ह पुजेनंतर प्रतिकात्मक रथ मांडला जातो. श्रीराम प्रभु रथारूढ झाले दुपारी ठिक ४ वाजता सालकरी बुवा पुजारी परिवार सह व निमंत्रितांसह श्री दिक्षीत यांच्या घरी जातात ज्या श्री बाबुराव दिक्षित यांच्या घरी (मंदिराचे पशिम दरवाजास) मंदिराचे बांधकाम सुरू अरतांना श्रीराम, लक्ष्मण, सीता यांच्या मुर्ती ठेवल्या होत्या त्यांच्या घरी सालकरी बुवांचा व पुजारी परिवाराचे दिक्षत परिवार व आहे त्या राम व्यायम शाळेतर्फे सन्मान करून गदा लाविली जाते. सालकरी बुवा व पुजारी परिवार श्री दिक्षित परिवार व उपस्थितांना रथयात्राचा शुभारंभ करण्याविषयी सांगतात. व मंदिरात येऊन आरतीस सुरूवात करतात आरती नंतर मानक–याचा सन्मान केला जातो. त्यावेळी गाभारा तुडूंब भरलेला असतो ढोल झांज्या नगारे यांचे गजरात भाविकजन जय सीता रामसीता हा गजर करीत असतात. संपूर्ण वातावरण रामरथ भक्तीमय झालेले आसते वातावरण निर्मीती अशी होते की आनंदातिरेकाने डोळ्यातून नकळत अश्रु ओघळतात. सर्व इंद्रीय जय सिता राम सीता या नादात तल्लीन होतात. रथयात्रेतील मानकरी म्हटले तर प्रथमतः श्रीराम रथ ओढणारे स्वयंमसेवक श्रीराम रथ हा श्री रास्ते आखाडा तालीम संघ यांच्या कडून ओढला जातो. तर श्री गरूड रथ हा श्री अहील्याराम व्यायाम शाळा यांच्या कडून ओढला जातो. रथ यात्रेची रथ ओढण्याची परंपरा प्राचिण आहे. इ.स.१७८५ साली कै सवाई माधवराव पेशवे नाशिक मुक्कामी राम दर्शनासाठी आले होते.येथे आल्यावर देवतेची यथासांग पुजा करून देवतेस दाग दागिने अर्पण केले जातात. शिवाय चैत्र उत्सावातील श्रीरामचंद्राच्या रथ उत्सवासाठी नविन रथ व त्याचे खर्चासाठी सालाना दोनशे रूपयांची सनद सरदार कै रास्ते यांना करून दिलेली आहे. हा श्रीराम रथ रास्ते आखाडा तालीम संघ यांच्या कडून ओढला जातो रथयात्रेची प्रथा इ.स.१७८५ पूर्वीपासून अस्तित्वात असावि असे वाटते.

रथ यात्रेस प्रारंभ करण्यापूर्वी मानक–यांचा ढोल नगारा झांज यांचे गजरात मानक–यांना प्रभुचा प्रसाद म्हणून सालकरी बुवान कडून हार घालण्यात येतो व श्री फळ देऊन सत्कार केला जातो. मानकरी म्हणजे श्री अहील्याराम तालीम संघाचे पदाधिकारी श्री रास्ते आखाडाचे पदाधिकारी श्री काळाराम संस्थानचे संन्मानिय अध्यक्ष विश्वस्त तसेच वंश परंपरागत सेवाकरणारे सेवेकरी उत्सवात व इतरवेळीही सेवा केणारे भाविक यांचा हार घालून व श्रीफळ देउन सत्कार करण्यात येतो. त्यानंतर सालकरी बुवांच्या सस्ते राजाधिराज श्री रामचंद्र महाराज की जय महारूद्र हनुमान की जय असा जयघोष करून श्रीफळ वाढविण्यात येते बुवांना जरीचे पांढरे शुभ्र उपरणे फेट्यासारखे डोक्यावर बांधले जाते. हेतू हा की रथयात्रेत बुवांचे उन्हापासून संवरक्षण व्हावे संरक्षण व्हावे व तसेच सालकरी बुवा म्हणून लवकर ओळख पटावि सालकरी बुवांच्या हातात श्री प्रभुरामचंद्राच्या पादूका व श्रीराम लक्ष्मण व सीता यांच्या भोगमुर्ती प्रभावळी ठेवल्या जातात. श्रीराम प्रभुंच्या भोग मुर्तीला छत्र यामदोन अलंकृत केले जाते व प्रभुंवर चांदीच्या चौरीने वारा घातला जातो. सर्वच उपस्थित भाविक प्रभुंच्या पादूकांचे दर्शन घेतात. प्रभुंचे दर्शन घेतात.रूतवात पावन होतात, कृतकृत्य होतात. आनंदित होतात प्रभुच्या पादूकांना व मूर्तीना हात लाऊन दर्शन घेण्याची सगळ्यांनाच मुभा असते कोणत्याही तर्‍हेचा कसलाही भेदभाव तेथे नाही. प्रत्येक जन पादुकांना स्पर्श करू शकतो व दर्शन करू शकतो. श्रीराम प्रभुंच्या पादुका व भोगमूर्ती घेउन सालकरी बुवा मंदिराभोवती एक प्रदक्षीणा मारतात. व पुर्वेस घंटेखालील बाजुस. चांदीची पाखी ठेवलेली आसते तेथे येतात प्रदक्षणा करून असंख्य भाविक दर्शनाचा लाभ घेतात. पालखीत विधिवत पूजा आरती करून श्रीराम प्रभुंच्या पादुका व भोगमुर्ती ठेवण्यात येतात व ख–या अर्थाने रथयात्रेस प्रारंभ होतो. येथून सालकरीबुवा प्रभुंना पाठ दाकवायची नही या भावनेने प्रभुनकडे तोंड करूनच चालतात म्हणजे पालखीकडे तोंड करून चालतात, उलटे चालतात जाणकार भाविक बुवांना उलटे चालतांना योग्य ते मार्गदर्शन करतात सालकरी मंदिराच्या पूर्वेस पूर्वे दरवाज्या बाहेर येतात तेथे गरूड रथ तयार असतो. श्री गरूड रथ व श्रीराम रथ उत्तम त-हेने सजवलेले असतात. त्यांची योग्य ती देखभाल केलेली आसते. ऑइलींग ग्रेसिंग केलेली असते तसेच ब्रेक सिस्टीम उत्तम तर्‍हेने काम करत असल्याचे तपासलेले आसते रथांना उत्तम तर्‍हेने रंगरंगोटी केलेली आसते. केळीचे खांब रथाची शोभा वाढवित असतात. रोषनाईसाठी दिव्यांच्या माळा हॅलोजन बल्ब यांचा उत्तम त-हेने वापर केलेला आसतो. तसेच ध्वनी क्षपणाची व्यवस्थाही उत्तम केलेली आसते. साळकरी बुवा रथाजवळ उलटे चालत पालखीकडे श्रीराम प्रभुनकडे तोंड करून येतात व रथारूढ होतात. श्रींची पालखीपण रथाच्या उंचीला मिळवून श्री सालकरी बुवांच्या हस्ते पूजा पुजा आरती उपचार होतात व श्रीराम प्रभुंच्या पादूका व भोगमुर्ती पालखीतून गरूड रथात ठेवल्या जातात तेथे पुजा आरती होते. श्री गरूड रथानवर सालकरी बुवांच्या हस्ते हार घालून श्रीफळ देउन सत्कार केण्यात येतो त्यानंतर श्री अहिल्याराम व्यायाम प्रसारक मंडळाचे मानकरी व धुरीचे मानकरी यांच्या हस्ते धुरीवर श्रीफळ वाढवुन रथ यात्रेस प्रारंभ होतो. धरी म्हणजे रथाच्या पुढील बाजुस जो लाकडी दंडा असतो ज्याला रथाचे नाडे गुंडाळलेले असतात व ज्यामुळे रथ वाळविता येतो त्या लाकडी दांड्यास धुरी म्हणता. फटाक्यांची आतिषबाजि होते. व राजाधिराज श्री रामचंद्र महाराज की जय महारूद्र हनुमान की जय जय सिता राम सिता या गजरात रथ पुढील बाजुस बाधलेल्या दोरखंडाने ( त्याला नाडा म्हणतात ) श्री अहिल्याराम व्यायाम प्रसारक मंडळाच्या कर्यकर्त्यांन कडून व भाविकांनकडून ओढावयास सुरूवात होते. श्री गरूड रथ हा श्रीराम रथाजवळ बाजुस थांबविला जातो साळकरी बुवांच्या हास्ते पुजा आरती होउन जयसीता रामसीता च्या गजरात श्री राम प्रभुंच्या भोगमुर्ती पालखीत ठेवल्या जातात.पालखीत मुर्ती ठेवल्यानंतर आरती केलीजाते व पालखी बाजुस घेतली जाते सालकरी बुवा गरूड रथातून उतरून श्रीराम रथावर आरूढ होतात. श्रीची पालखी श्रीराम रथाजवळ घेतली जाते पूजा करून श्रीराम प्रभुच्या मुर्ती रथात ठेवल्या जातात पूजा आरती होउन सालकरी बुवा श्रीराम रथातून खाली उतरतात उलटे श्रीराम प्रभुनकडे तोंड करून चालावयास सुरूवात करतात आता ही घरी रथयात्रेची सुरूवात होते. श्रीराम प्रभुनकडे तोंड करून उलटे चालनारे सालकरी बुवा त्याच्या मागोमाग श्रीची पालखी त्याच्या पाठीमागे श्रीराम प्रभुच्या मुर्ती आसलेला श्री गरूड रथ व त्यानंतर श्रीराम रथ अशी भव्य रथयात्रा होते. जयसीता रामसीता या नामाचा सारखा जय घोष सुरू असतो या रथयात्रेबरोबरच ढोल नगारा पथक , बॅंन्ड पथक, लेजीम पथक याचाही समावेश असतो.

अशी ही भव्य रथयात्रा श्रीराम मंदिराचे पूर्वव्दारा पासून सुरू होते. रथयात्रा गणेश वाडीतून वाळवंटात येते गाडगेमहाराज पुलाच्या खाली येते श्रीराम रथ व सालकरी बुवा तेथेच थांबतात सालकरी बुवा व्रतस्थ आसतात त्यांना नदि ओलांडायची नसते श्री गरूड रथ नदी ओलांडून श्री रोकडोबा मंदिराजवळ जातो.तेथे पुजा आरती होउन गाडगे महाराज पुलाखालून डावीकडे वळतो व सरळ नेहरू चौक , दहिपुल, चांदवडकर लेन या मार्गाने वळून मेनरोडला येतो. मेनरोडहून बोहोरपट्टी , दरकारवाडा भांडीबजार या मार्गे बालाजी मंदिरा पर्येंत येतो. तेथे आरती होते. कल्पना अशी आहे श्री हनुमान रामासाठी बालाजीची आरती आणतो तशीच कल्पना आशी श्री गरूडरथ पुढे असतो व त्यात श्री हनुमान व श्रीराम प्रभुच्या पादूका असतात. तर श्री हनुमान समस्त भाविकजनांना गावात जाऊन सांगतो की चला चला भाविकजन हो चला श्रीराम प्रभु रथारूड होउन येत आहेत चला दर्शनाला चला बालाजी मंदिरापासून श्री गरूड रथ कपूरथका पटांगनात येतो व थांबतो येथे सर्वच जन विश्रांती घेतात जलपान करतात येथेच बालाजी कोटावर श्री गायधनी परिवारातर्फे पूर्वापार परंपरागत सर्व श्री गरूड रथ ओढणा–या भाविकांना जलपाण दिले जाते श्रमपरिहार केला जतो. आजही ही परंपरा त्यांचे वंशज श्री विश्र्वनाथ ऊर्फ ( बाळासाहेब ) गायधनी आणि बंधू परिवार निष्ठेने पाळीत आहेत. जलपानाच्या विश्रांतीनंतर रथयात्रा गाडगे महाराज पुलाखालील खंडव्यावरून नदी ओलांडून पंचवटी परिसरात येते. तोपर्यंत श्री सालकरी बुवा व श्रीराम रथ येथेच असतात. भाविक प्रचंड संख्येने दर्शनास येत असतात हजारोच्या संख्येने भाविक म्हसोबा पटांगनात गाडगे महाराज पूल रामसेतूपूल नदीचे दोन्ही काठचा परिसर येथे प्रचंड प्रमाणात उपस्थित राहून श्रीराम प्रभुच्या दर्शनाचा लाभ घेतात. नाशिक शहरामध्ये जास्तित जास्त गर्दीचा उत्साहाचा हा दिवस आसतो ढोल नगारे झांजाच्या गजरात जयसीता रामसीता जय घोष सुरूच असतो. प्रत्येकजन उत्सहाने न्हावुन निघालेला आसतो राममय झालेला आसतो फटाक्यांची आतिषबाजी होते अशी ही रथ यात्रा श्रीची पालखी , सालकरी बुवा , श्री गरूड रथ , श्रीराम रथ अशी श्री रामकुंडावर येते रथातून श्री च्या पादुका व भोगमूर्ती विधिवत पुजा करून पालखित ठेवल्या जातात व वाजत गाजत रामकुंडावर ठेवतात तोपर्यंत रात्रीचे ९ वाजलेले असतात रामकुंडावर कोडशोपचार पूजा अभिषेक होतो व अदभुत स्नान होते येथे विशेष की प्रत्येक भाविकस पादुका व मुर्तीला पाणि वाहता येते स्नान घालता येते कोणत्याही त-हेचा मतभेद तेथे नाही स्पृश्य अस्पृश्य लहान मोठा स्त्री पुरूष कोणीही श्रीची पादुका व भोगमूर्तीस रामकुंडातील पवोत्र जलाने स्नान घालू शकतो त्यासाठी पुजाधिकारी पुजारी परिवारातील तरूण मंडळी पादुका व मुर्ती घेउन रामकुंडाचे काठा काठाने प्रदक्षिणा मारतात जेणेकरून उपस्थित असलेला प्रत्येक भाविक लाभ घेऊ शकेल अदभुत स्नानानंतर मूर्तीस पोषाख चढवून अतिशय ऊत्साहाने आरती होते व परत पादुका श्री गरूड रथात , मूर्ती श्रीराम रथात , पालखी पुढे त्या मागे उलटे चानणारे सालकरी बुवा. त्यामागे गरूड रथ व श्रीराम रथ अशी रथयात्रा रामकुंडावरून पाताळेश्र्वर मंदिराकडे धर्मशाळेवरून शनिचौकातून पुणे विद्यार्थी गृहावरून मंदिराच्या पूर्व द्वारास येते. विधिवत पूजा आरती होउन पादुका व मुर्ती श्री चे पालखीत ठेवल्या जातात. पूर्व दरवाजास पुजारी परिवारातील सुहासिनीनकडून व भाविक स्त्रि वर्गाकडून प्रभुस अवक्षण केले जाते पालखी व हनुमानाची मुर्ती विधिवत पुजा आरती करून मंदिरात आणली जाते तेथे आरती होते. सर्वांना पिठीसाखर प्रसाद दिला जातो मंदिरात फटाक्यांची आतिषबाजि केली जाते व नंतर रोज आरती होउन मंदिर साधारण रात्रौ १:३०-2 चे सुमारास बंद होते असा हा रथ यात्रेचा आनंद उत्सवाचा सोहळा संपन्न होतो.

ऑनलाईन दर्शन

मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम

दैनंदिन कार्यक्रमांचे वेळापत्रक

 • पहाटे
  ५:३० ते ६:३० श्रींची काकडआरती
 • सकाळी
  ७:०० ते ८:०० सनई वादन व भुपाळी
 • सकाळी
  ८:०० ते १०:०० श्रींची मंगल आरती
 • सकाळी
  १०:३० ते १:०० श्रींची महापुजा महान्यास, महाआरती
 • दुपारी
  ३:०० ते ५:०० विविध भजनी मंडळाचे भजन
 • सांयकाळी
  ७:०० ते ८:०० श्रींची शेजआरती
 • रात्री
  ८:०० ते १०:०० किर्तन