मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम

दैनंदिन कार्यक्रमांचे वेळापत्रक

  • पहाटे ५:३० ते ६:३० श्रींची काकडआरती
  • सकाळी ७:०० ते ८:०० सनई वादन व भुपाळी
  • सकाळी ८:०० ते १०:०० श्रींची मंगल आरती
  • सकाळी १०:३० ते १:०० श्रींची महापुजा महान्यास, महाआरती
  • दुपारी ३:०० ते ५:०० विविध भजनी मंडळाचे भजन
  • सांयकाळी ७:०० ते ८:०० श्रींची शेजआरती
  • रात्री ८:०० ते १०:०० किर्तन
  • रात्री १०:०० मंदिर बंद होते.

दैनंदिन कार्यक्रम विस्तृत

मंदिरातील दैनंदिन प्रथेप्रमाणे पहाटे ५ वाजता मंदिर उघडले जाते व रात्रौ १० वाजता बंद होते. ठिक सकाळी ५:३० वाजता काकडा आरती होते. तेव्हा देवांना आवळून उठवले जाते भजन गाईले जाते सुमारे आरधा ताद काकडा आरती चालते श्रीचे अंगावरील वस्त्र बाजुला करून प्रभुचरणाची पुजा केली जाते. व सर्वांना प्रभुंचे चरण दर्शन घेता येते. काकड आरतीस येणार्या सर्व भक्तांना नेवैद्य दाखविलेले लोणी खडीसाखर प्रसाद म्हणून दिला जातो. तसेच शर्करायुक्त दुध प्रसाध म्हणून दिले जाते.

ठिक सकाळी ९:३० वाजता माध्याळ पूजेस सुरूवात होते.रोज बोडशोपचार पूजा होत असते रोज प्रभुच्या चरणांची पुजा होते. ही पूजा ११ वाजेपर्यंत चालते हार फुले यांनी प्रभुंचा शृंगार केला जातो. ११.१५ च्या सुमारास पुजाधिकारी पुजारी घराकडून नैवैद्य आणला जातो व आरती होते. आरतीचे ढोल झाजा घंटा विशिष्ट ताला सुरात वाजत आसतात. तदनंतर मंत्र पुष्पांजली होते. व भाविकांना आरती घेता येते. विशेष आर्ध युक्त व शंखाने श्रोसन केलेले जलाचे प्रोक्षण गाभार्‍यात भाविकांवर केले जाते.आरती व पवित्र जल प्राशनाने संपूर्ण पूजा आरतीचे पुण्य फळ भाविकांना मिळते. पुजाधिकारी पुजारी बुवा उपस्थित भाविकांना तिर्थ प्रसाद तुळशी देतात व मंदिरा भोवती आसलेले देवतांना गंध फुल तीर्थ प्रसाद वाहुन पूजा करतात.

दिवसभर मंदिरात दर्शनासाठी पूजे साठी अभिषेकासाठी भाविकांची गेर्दी आसते. अभिषेक मात्र सकाळी ९:३० पर्यंतच करता येतो. पुजाधिकारी पुजारी घराण्याकडे अभिषेक करण्याची परंपरा आहे.

संध्याकाळी ७:३० वाजता शेज आरती सुरू होते ती एक तास चालते श्रीच्या मुर्तीवरील दिवसभरातील फळमाला काढल्या जातात. ताज्या माळा व फुलानी शृंगार केला जातो देवांना आळउन झोपविले जाते जवळच उत्तरेकडील बाजूस शेजघर आहे त्यावर राम व सीतामाई यांच्या भोगमुर्ती झोपविल्या जातात श्री लक्ष्मण पहारादेत उभे असतात अशा रितीने रात्रौ १० वाजता मंदिर बंद केले जाते.

श्री लक्ष्मण रात्री पहारा देत उभे असतात ह्या संदर्भात लक्ष्मणाच्या ह्या कठोर वृताबद्ल.

राम रावण युध्दात रामावर विजय मिळविण्याच्या हेतुने रावण पूत्र इंद्रजित , निकुंभिला गुहेमध्ये यज्ञ करतो यज्ञकुडातून जो रथ येइल त्यावर आरूढ होउन जर इंद्रजित युध्द करू लागला तर त्याला कोन्हीच मारू शकणारा नाही ही गोष्ट बिभिषणाला ठाऊक असते म्हणून बिबिषण प्रभु श्रीरामाना म्हणतो की ,इंद्रजितला ब्रम्हदेवाचे वरदान आहे की, बारा वर्षे ज्याने निद्रा आणि आहार याचा त्याग केला आहे , त्याच्याच हातून इंद्रजितला मरण येइल म्हणजे बारा वर्षे ज्याने अन्नाचा त्याग केला आहे . आहाराचा त्याग केला आहे निद्रेचा त्याग केला आहे तोच फक्त इंद्रजितला मारू शकतो वनवासाला निघाल्यानंतर लक्ष्मणाने एकही दिवस निद्रा केली नाही. श्रीराम प्रभु शयन करावयाचे तेव्हा लक्ष्मण प्रभुंच्या सेवेत पहारा देत जागता रहावयाचा.

मंदिरातील गाभार्‍यात श्रीराम लक्ष्मण सीता ह्यांच्या भोगमुर्ती शिवाय गणपती महादेव शाळीग्राम रामपंचायतन मारूती मंगल यंत्र अशा इतरही अनेक मूर्ती आहेत सर्वांची शास्त्रोक्त पध्दतीने पुजा होत असते.

दर एकादशीस सकाळी ९ ते १ वाजेपर्यंत राजोपचार सहीत स्नानांगभूत बदशोपचार पूजा होत असते देवतांना नविन पोषाख व शृंगार चढविला जातो सायंकाळी (साडेसहा वाजता ) ६:30 श्री प्रभुरामचंद्राच्या पादुकांची चांदीने मढविलेल्या पालखीतून मंदिराचे प्रांगणात प्रदक्षिणा होते. ढोल झांज व बॅंडच्या सुरात सवाध मिरवणूक होते. विशेष की श्रीराम प्रभुंच्या पादुकांचे दर्शन पादुकांवर मस्तक ठेउन प्रत्येक भाविकास दर्शन घेता येते स्पृश्य- अस्पृश्य उच्च निच लहान मोठा स्त्री पुरूष असा भेदभाव तेथे नाही जो कोणी भक्त प्रभुच्या भक्तीने प्रेरीत होऊन आलेला आसेल तो प्रभुचरणावर मस्तक ठेवून दर्शन घेऊ शकतो पावण होऊ शकतो श्रींच्या पादुकांची पालखीतून प्रदक्षीना झाल्यानंतर आरती होते. तदनंतर प्रत्येकास पिठीसाखरेचा प्रसाद वाटण्यात येतो.