स्थानमहात्म्य

पंचवटी निवासी प्रभु श्रीरामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावण झालेल्या जागेवर वाद्तव्याच्या जागेवर , पर्ण कुटीच्या जागेवर बांधलेले श्री काळाराम मंदिर नाशिकला या पवित्र गोदावरीत गंगेत स्नान कराव पावण व्हाव व श्रीराम प्रभुंचे दर्शन घ्यावे ही प्रत्येक भारतीयाची आंतरीक इच्छा श्रीराम प्रभुंच्या दर्शनाने मिळणारा आनंद वेगळाच श्रीराम प्रभुंच्या दर्शनाने जिवनाचे सार्थक झाले. जिवन सफल झाले, जिवन मंगलमय झाले हीच प्रत्येकाची श्रध्दा हाच प्रत्येक भाविकाला मिळणारा आनंद येथील वैशिष्ट्ये म्हणजे आजपर्यंत कोणत्याही त-हेचे व्यापारीकरण झालेल नाही भक्ताने यावे दोन हात मस्तक टेकून प्रभुची प्रर्थाना करावी प्रभुला शरण जावे कारण तो उभा आहे छातीवर हात ठेउन तो म्हणतो मी आहे. जो मला शरण येतो जो माझ्या चरणी लिन होतो. जो म्हणतो की प्रभु मी तुझा त्याच्यासाठी मी आहे. मी त्याला सर्व प्राणी पात्रांनपासून भय देतो. त्यासाठीच मी छातीवर हात ठेवून उभा आहे. कोणी काही मागितले्त नाही तरी मी ओळखतो की माझ्या भक्ताला काय हावे आहे. ते त्याला न मागता मी देतो असा भक्तवत्सल श्रीराम त्याच्या वास्तव्याने या मंदिरात कोणत्याही भक्ताला भाविकाला पैसे ठेवण्याची पैसे टाकण्याची अभिषेक करण्याची कोणत्याही त-हेने भाविकाला त्याच्या दर्शनाखुखा व्यतिरीक्त कोठेही काहीही मागितले जात नाही सांगितले जात नाही भाविकांनी यावे दर्शन करून तृप्त व्हावे प्रर्थना करावी मनशांती मिळावावी व परत दर्शनाला येण्याचा निश्चय करावा अशी येथील पध्दत आहे कसलीही जबरदस्ती भाविकांनवर केली जात नाही वा त्यांना कुठल्याही त-हेने दर्शना व्यतिरीक्त कोठल्याही गोष्टीसाठी उद्युक्त केले जात नाही मंगलमय वातावरणात यावे दर्शन घ्यावे तिर्थ घ्यावे प्रसाद घ्यावा व आपली मनोकामना पूर्ण करावी ते खालील काव्यात वर्णन केलेले आहे.

श्री काळाराम संस्थान विश्र्वस्त मंडळ हे मंदिराचे व्यवस्थापण व जिर्नोध्दार उत्तम तर्‍हेने सांभाळीत आहे. त्यामुळे मंदिराचे नाजुक नक्षीकाम आज दोनशे वर्षे हुवून गेली तरी आपण अगदी नव्यासारखे पाहूशकतो. ह्या जिर्नोध्दारास अंदाजे पावणे दोन कोटी रूपये खर्च आला आहे.

पंचवटी निवासी श्री रामचंद्रांचा ध्यान मंत
क्षेत्र नाशिक हे पुरातन असे श्री गौतमिचे तटी |
सीताराम सहीत लक्ष्मण तिथे वास्तव्य पंचवटी ||
श्रीराम प्रभुंच्या पदे पुनित ही झाली भूमी मंगल |
जे जे घेती प्रसाद तीर्थ प्रभुंचे पूर्णत्व मनोरथ ||१||
|| राजाधिराज श्री रामचंद्र महाराज की जय ||
|| महारूद्र हनुमान की जय ||
|| श्री समर्थ रामदास स्वामी की जय ||
||जय जय रघुविर समर्थ ||

ऑनलाईन दर्शन

मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम

दैनंदिन कार्यक्रमांचे वेळापत्रक

 • पहाटे
  ५:३० ते ६:३० श्रींची काकडआरती
 • सकाळी
  ७:०० ते ८:०० सनई वादन व भुपाळी
 • सकाळी
  ८:०० ते १०:०० श्रींची मंगल आरती
 • सकाळी
  १०:३० ते १:०० श्रींची महापुजा महान्यास, महाआरती
 • दुपारी
  ३:०० ते ५:०० विविध भजनी मंडळाचे भजन
 • सांयकाळी
  ७:०० ते ८:०० श्रींची शेजआरती
 • रात्री
  ८:०० ते १०:०० किर्तन