मूर्तीचे स्वरूप वर्णन वैशिष्ट्य

Kalaram Murtiप्रभु श्रीराम म्हटले की आपणासमोर अजानुषाहू, शामवर्ण, धर्नुधारी श्रीरामांची मुर्ती उभी राहते. पण येथील प्रभु श्रींराम वनवासांत आसल्यामुळे वस्त्रभूषणांचा त्याग करून वल्कल परिधान केलेल्या आहेत.

अगस्ती मुनींच्या आदेशाप्रमाणे प्रभु श्रीराम, लक्ष्मण, सीता पंचवटीत निवासासाठी येतात. तेव्हा अगस्ती मुनी म्हणतात,
भवानपि सदाचारः शवतशत्तुध परिक्षणे |
आपि यात्र वसन, राम तापसान पालयिस्यमि ||२०||
श्रीमद् वाल्मीकाय रामायणे अरण्यकाळ चतुर्दश स्वर्गः

“श्रीराम, आपण सदाचारी आहोत व ॠर्षीमुनींची रक्षा करण्यास समर्थ आहोत तेव्हा पंचवटीत निवास करून तपस्वी मुनिंचे पालन संरक्षण करावे”. अशाच प्रकारचा उल्लेख श्री संत एकनाथ महाराज विचारीत श्री भावार्थ रामायणांत आहे. तो असा.

मजसवे येवोजियां ॠषी | जाहले दंडकारण्यवासी |
कोणी राजा नाही या देशीं | म्हणूनि राक्षशी व्यापिले ||३||
दंडकशापे दंडकारण्य | ते करावया अति पावन | तू आलासी रघुनंदन राक्षसघ प्रतापी ||४||
तुझे झालिया आगमन | राक्षस निर्दाळसी संपूर्ण | येथोनि आतां वस्ती जाण वचन पावन श्रीरामें ||५||
श्रीराम क्षेत्र दंडकारण्य | ऐसे गर्जेल पुराण | हाचि प्रयोग ब्राम्हण | अति सज्ञान पढतील ||६||
….अख्यकांडे अगस्ति श्रीराम दर्शन अस्वगृहणनाम पंचमोध्यायः

…..|| पद्यपुरीं निशाचर | वसताती अती दुर्धर | तेणे भये ओस नगर | तीर्थ परिचार खुंटला ||५||
त्रिशिरा आणि खर दूषण | ओस करोनियां जनस्थान | राक्षस वसताती दुर्जन | तीर्था कोणी जाऊं न शके ||६||
तेथे करावया वस्ती | पंचवटी के सीतापती | स्वये धाडीला अगस्ती | राक्षस घातकी श्रीराम ||७||
राक्षसांचे कुळनिर्दळण | समूळ करील रघुनंदना या लागी पंचवटीस्थान | दिधले नेमून अगस्तीने ||८||
...... स्वस्ति अरण्याकडे श्री भावार्थ रामायणे अरण्याकडे षष्ठोडद्यायः

श्रीमद वाल्मिकी रामायण तसेच श्री संत एकनाथ महाराज विरचित श्री भावार्थ रामायण यांचे वरील प्रमाणे श्रवण करता श्रीप्रभुरामचंद्राच्या मूर्तीचें वैशिष्ट्ये समजाऊन घेऊ या.....

प्रभु श्रीराम म्हटले की, अन्यायासमोर अजानुबाहु शामवर्ण, धर्नुधारी श्रीरामांची मुर्ती उभी राहते.

पण येथील प्रभु श्रीराम वनवासात असल्यामुळे वल्कधारी आहेत. श्रीप्रभु श्रीरामाचा उजवा हात छातीवर आहे, उजवे खांद्यावर धनुष्य आहे व डावा हात सरळ प्रभुंच्या चरणाकडे आहे. प्रभु अभय मुद्रेत उभे असून शरणागत वत्सल श्रीराम हेच सुचवितात की....

सकृदेव प्रपन्नाय तवास्मिनी चयायते |
अभयं सर्व भूतेभ्यो ददम्येतद व्रतं ममा ||

“जो मला शरण येवून, चरणी लीन होवून रक्षणाची प्रर्थाना करेल त्याला सर्व प्राणी मात्रांपासून मी अभय देतो. हे माझे व्रत आहे “

ॠषीमुनींच्या विनंतीवरून याच परिसरांत धर्म विध्वंसक असणाया खर, दूषण, त्रिशिरा, आदी चौदा हजार रक्षसांचा वध करून श्री प्रभुरामचंद्रांनी ही तपोभूमी भयमुक्त केली व वनवासांत दंण्डकारण्यातून भ्रमण करतांना ॠषिमुनींना दिलेले वचन / प्रतिज्ञा पूर्ण केली.

अभयमुद्रेतील श्री प्रभुरामचंद्राचे दर्शन ‘अमोघ’ आहे. जो कोणी भक्त अनन्यभावे श्री रामदर्शन करेल प्रभुचरणी लीन होतील, प्रभुची प्रर्थना करेल, प्रभुंला शरण जाईल त्याला छातीवर हात ठेऊन प्रभु श्रीराम सांगतात की, मी आहे, जो कोणी मला शरण आला त्यासाठी मी आहे. त्याची मनोकामना पूर्ण करण्यासाठी मी आहे. त्यांचा संरक्षण करण्यासाठी मी आहे.  माझ्या भक्तांनसाठी मी येथे छातीवर हात ठेऊन उभा आहे भक्त काही मागो न मागो त्याला माझ ‘अमोघ’ दर्शन झाल्याने तो माझा झाला व त्याच्या मनोकामना पूर्ण करणे हे माझे व्रत आहे.

तुलसीरामायणात प्रभु म्हणतात…
जदपि सखा तव इच्छा नाहीं |
मोर दरसु अमोघ जग माही ||

… भक्ता जरी तुझी इच्छा नसली, जरी तू काही मागितले नाहीस तरी माझे दर्शन ‘अमोघ’ आहे. तू माझा कृपापात्र होणारच.

अशा या अजानुबाहु, शामवर्ण , शरणागत भयहरण श्री प्रभु रामचंद्राचे दर्शन करून आपण पावन होऊ या.

ऑनलाईन दर्शन

मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम

दैनंदिन कार्यक्रमांचे वेळापत्रक

 • पहाटे
  ५:३० ते ६:३० श्रींची काकडआरती
 • सकाळी
  ७:०० ते ८:०० सनई वादन व भुपाळी
 • सकाळी
  ८:०० ते १०:०० श्रींची मंगल आरती
 • सकाळी
  १०:३० ते १:०० श्रींची महापुजा महान्यास, महाआरती
 • दुपारी
  ३:०० ते ५:०० विविध भजनी मंडळाचे भजन
 • सांयकाळी
  ७:०० ते ८:०० श्रींची शेजआरती
 • रात्री
  ८:०० ते १०:०० किर्तन