व्दादशी ( रथ यात्रेचे दुसरे दिवशी )

आजचे दिवशी श्रीराम जन्मोत्सव अंतरर्गत सकाळी काकडा आरती, सकाळी ९वा मंगल आरती व नंतर सालकरी बुवानर्फे विधिवत पुजा होते. उत्सव समाप्ति निमीत्त श्री सत्यनारायण पुजन केले जाते उत्सवातील मानकरी रथाचे मानकरी आहिल्याराम व्यायाम शाळेचे मानकरी रास्ते आखाडा तालीम संघाचे मानकरी अशा विविध सेवातील भक्तांना मानक–यांना सन्मानाने निमंत्रित केले जाते. व ते सर्वजन उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतात सायंकाळी नाशिक मधिल विद्वान ब्रम्हवृंदाना निमंत्रित केले जाते व मंदिरात मंत्र जागरणाचा कार्यक्रम होतो मंदिर ब्रम्हणवृंदाचा मंत्रोद्गाराने भारले जाते. गोपाल काला होतो त्याची आरती होते. त्याचवेळी सभामंडपामध्ये काल्याचे किर्तन सुरू असते. काल्याचे कीर्तनाला नित्य भाविकांनबरोबर बरेच दंपत्य ( पति पत्नी ) संतान प्राप्तीसाठी प्रभुची कृपा व्हावी म्हणून श्रध्देने उपस्थित असतात किर्तनकार बुवा गोपाल काल्याचे कीर्तनात संतान प्राप्तीच्या इच्छेने आलेल्या दामपत्यांना ओटी देतात. त्या प्रसादामुळे अनेक दामपत्यांना संतान प्राप्ती झाल्याची उदाहरणे आहेत त्यामुळे भाविक मोठ्या श्रध्देने कीर्तनाचा लाभ घेतात मंदिरात आरतीनंतर मंत्रजागरण झालेले ब्रम्हणवृंदाना दक्षिणा देउन व गोपाळ काला देऊन सन्मान केण्यात येतो. येणा–या प्रत्येक भाविकास गोपाळ काल्याचा प्रसाद दिला जातो. अशा त-हेने चैत्र शु ||१२ || द्वादशी पर्यंत श्रीराम जन्माउत्सव साजरा केला जातो.

श्रीराम जन्मोउत्सव सुरू होण्यापूर्वी संपूर्ण मंदिर परिसरात साफ सफाई करून , जाळजळमटे काढून मंदिर पाण्याने स्वच्छ धुतले जाते मंदिराचे आतिल गर्भगृह पुजाधिकारी पुजारी परिवार स्वच्छ करते दर्शनार्थींचा गाभारा व संपूर्ण मंदिर परिसर अगदी थेट कळसापर्यंतचा भाग अग्निशमन दलाच्या मोटारीने उच्च दाबाने पाणी फवारून स्वच्छ केला जातो पंखे दिवे स्वच्छ करून बसविले जातात. व मंदिरावर भव्य रोषणाई केली जाते.

ऑनलाईन दर्शन

मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम

दैनंदिन कार्यक्रमांचे वेळापत्रक

 • पहाटे
  ५:३० ते ६:३० श्रींची काकडआरती
 • सकाळी
  ७:०० ते ८:०० सनई वादन व भुपाळी
 • सकाळी
  ८:०० ते १०:०० श्रींची मंगल आरती
 • सकाळी
  १०:३० ते १:०० श्रींची महापुजा महान्यास, महाआरती
 • दुपारी
  ३:०० ते ५:०० विविध भजनी मंडळाचे भजन
 • सांयकाळी
  ७:०० ते ८:०० श्रींची शेजआरती
 • रात्री
  ८:०० ते १०:०० किर्तन