मंदिरातील इतर देवता

मंदिरात पूर्व महाव्दाराने प्रवेश करता प्रथमतः ओवरीत उजवे बाजुस श्री नृसिंह महाराज, श्री गोपालदास महाराज यांचे छोटेसे मंदिर आहे. पुढे चाळीस खांबी प्रशस्त सभामंडप आहे. त्यात प्रभुरामचंद्राकडे तोंड करून श्री दास मारुती दोन्ही हात जोडून, प्रभुचरणांवर दृष्टी ठेवून ‘श्रीराम जयराम जयजयराम’ असा जप करीत प्रभु सेवेसाठी उभा आहे. सभा मंडपात धार्मिक कार्यक्रम होत असतात. दररोज सकाळी ज्ञानेश्र्वरी वाचन, हरिपाट, दुपारी महिला वर्गातरर्फे भजन व रात्रौ ८.३० ते १०.०० या वेळात किर्तन असा कार्यक्रम असतो. रोजचे किर्तन “श्री काळाराम किर्तन मंडळ” यांचे तर्फे आयोजित केले जाते व गेली पन्नास वर्षात त्यांत आत्तापावेतो एकही वेळा खंड पडलेला नाही. सभामंडपाच्या वायव्या कोपर्‍यात दोन देवळे आहेत त्यांत प्रभुंच्या पादुका व एक पिंड आहे व शेंदुर लावलेली मारूतीची मुर्ती आहे. या दोन देवळांबद्ल अशी दंतकथा सांगितली जाते की, श्रीप्रभु श्रीरामचंद्र व श्री दत्तमहाराज येथेच बसून चर्चा करीत असत. ते स्थान जागृत मानले जाते. श्रीप्रभू श्रीरामचंद्र व श्री दत्तमहाराज चर्चा करीत असतांना एकदा हनुमान मध्येच तेथे आल्याने ओशाळले. तशी हनुमानाची मान घेतलेली व दोन्ही हाथ खाली सोडलेले अशी मूर्ती आहे. सहसा मारूतीची मूर्ती हातात गदा घेतलेली अशीच असते. मारूतीचे मुर्तीला शेंदुर आहे. हे स्थान जागृत समजले जाते. भाविकांची तेथे मोठी श्रध्दा आहे. श्री दत्तजयंतीला येथे ’श्री दत्तजन्म’ साजरा होतो.

सभामंडपातून श्रीरामभक्त मारुतीचे दर्शन करून समोरील ११ पायर्‍या चढून गेल्यावर मध्यभागी मधुर आवाजाची घंटा आहे. घंटानाद करीत पुढील पायर्‍या चढून आपण पूर्वेकडील द्वार मंदिरात मुख्य उंबरठ्यावर उभे राहतो. तेथून प्रभुचे नयन मनोहर देर्शन होते. आता मंदिरात येण्यासाठी आपण एकूण १४ पायर्‍या चढून आपण उंबरठ्यावर येतो आता या १४ पायर्‍याबद्ल निरनिराळे प्रकारे संगती लावली जाते.

आता मुख्य मंदिरात गाभार्‍यात दर्शन घेण्यासाठी भक्ताला तीन पायर्‍या उतरून आतील गाभार्‍यात उतरावे लागते. एकेक पायरी उतरतांना भक्तामध्ये एकेक पातकाचा नाश होतो व भक्त प्रभुंचे दर्शन घेतो. आता एकेक पायरी उतरतांना एकेक पातकाचा नाश म्हणजे पहिली पायरी उरतली की भक्ताला आदि दैविक पातकातून मुक्ताता, दुसरी पायरी उतरली की भक्ताला आदिमौतिक पातकातून मुक्तता तर तिसरी पायरी उतरल्यानंतर भक्ताला आध्यात्मिक पातकातून मुक्तता मिळते व पापमुक्त होउन भक्त प्रभुला शरण येतो. श्रीरामचरणी लीन होतो अशा सर्व पापांपासून मुक्तता मिळून भक्ताला श्रीरामदर्शनाने अति आनंद मिळतो व श्रीराम प्रभु भक्ताची मनोकामना पूर्ण करण्यासाठी छातीवर उजवा हात ठेऊन उभा आहेच. आतील गाभार्‍याला आठ खांब आहेत व आठ खांबावर आतील गाभारा आहे. त्यावर घुमट असून अतिशय सुंदर नक्षीकाम केलेले आहे. गाभार्‍याला असलेले आठ खांब असे सुचवितात की जो कोणी भक्त तीन पायर्‍या उतरून सर्व पापांपासून मुक्त होवून श्रीराम प्रभुंना शरण जायीन. त्याचे अष्ट सात्विक भाव जागृत होईल व त्यास अष्टैश्र्वर्य सुखांची प्राप्ती होईल श्रीराम, लक्ष्मण, सीता यांचे मंगलमय दर्शन घेऊन भक्त डावीकडील दक्षिणव्दाराने  बाहेर पडतो. पायर्‍या उतरल्यानंतर समोरील आवारात पूर्वापार असलेले श्री मल्हारी म्हाळसाकांताचे ( श्री खंडोबाचे ) छोटे मंदिर आहे. त्याचे दर्शन घेऊन प्रदक्षिणा घालतो. तेथेच नैवृत्य कोपर्‍यात श्री सिध्दिविनायकाचे मंदिर आहे त्यास प्रदक्षिणा घालून वायव्य कोपर्‍यात औदुंबर व दत्त पादुका आहेत. त्यांचे दर्शन घेऊन भक्त प्रदक्षिणा पुर्ण करतो.

कोणतेही कार्य करतांना प्रथमतः गणेश वंदन करतो. पण येथेतर गणेश मंदिर मंदिराचे मागील बाजुस नैर्ॠृत्य दिशेला आहे. हे कसे? तर

ही मंदिराचे मागिल बाजुस नैर्ॠृत्य बाजुस असलेली गणेशाची मूर्ती मंदिराचे दगडी बांधकाम बांधण्याच्या अगोदर पासूनची असल्याने आहे तसीच व त्याच जागी ठेवण्यात आली व भक्तांना श्रीराम प्रभुंचे दर्शन करतांना प्रथमतः श्री गणेश दर्शन घेता यावे या हेतूने घंटे कडील पूर्वे कडील चौदा पायर्र््याग चढतांना अनायसेच श्री गणेशदर्शन करून मंदिरात येता यावे म्हणुन पायर्‍या चढतांना डावीकडील ओवरीकडे सहज दृष्टी टाकलीतर शेंदूर चर्चीत श्री गणेशाची मूर्ती आहे. त्याचे अनायसेच दर्शन घेउन भक्त श्रीराम दर्शनास जातो.

मंदिराचे बांधकाम इ.स.१७८०-१७९२ ह्या कालावधीत झाले. मंदिराचे बांधकाम पूर्ण होइपर्यंत श्रीराम, लक्ष्मण व सीतामाई हयांच्या मूर्ती बाबुराव दिक्षित यांच्या घरात ठेवल्या होत्या. १२ वर्ष पूजारी घराण्यातील पूर्वज तेथे जावून श्रींची पुजा अर्चा करीत असत. प्रतिष्ठापणा करते समयी ह्या मूर्ती मागील दाराने / पश्चिम दाराने आणल्या गेल्या म्हणून मुख्य मंदिराचे मागील बाजुस गणपती आहे. हे ह्या मंदिराचे वैशिष्ट्ये आहे. सर्वसाधारणपणे गणपती नेहमी पुढे असतो.

प्रतिष्ठापणा करण्यापूर्वी निस्सिम रामभक्त कै. तिमया महाराज बालाजीवाले यांनी सर्व उपचार केले. नंतर मूर्ती उचलून मुळ जागी ठेवताना त्या जागल्या हालेनात तेव्हा तिमया महाराजांनी प्रभु प्रर्थना केली व आपल्या हातातील काठीने प्रभुचरनास स्पर्श केला व काठी खाली ठेवली व दुसर्‍या हाताने सहजरीत्या मुर्त्या उचलल्या व मूळ जागी ठेवल्या. आजही तिमया महाराजांची काठी मंदिरात आहे. व तीचीही भक्तीभावाने रोज पूजा होत आसते. गाभार्‍यात मूर्ती प्रथम जेथे ठेवल्या होत्या ती जागादेखील मंदिरात सक्षिण दरवाजाने बाहेत पडतांनाच एक चौकोणी चिरा आहे. तेथेही भाविक श्रध्देने पुजा आर्चा करतात. व दर्शन घेतात.

पुजाधिकारी उर्फ पुजारी पंधराव्या शतकापासून अव्याहतपणे पाळी पाळीने रोज पूजा अर्चा करीत आहे. दर एकादशीस मूर्तीला स्नान घातले जाते. वर्षातून फक्त २४ स्नान होतात. सहा इंचपेक्षा मोठी मूर्ती आसेन तर दररोज स्नानाची आवश्यकता नाही असे शाश्त्रात सांगितलेले आहे. ह्या मूर्ती वल्कधारी आहेत, वालुकामय आहेत. स्नानाच्या वेळी वाळूचे कण निघतात व ह्यामूळे मूर्तीची झीज होऊ नये असाही पूर्जांनी विचार केला असेल त्यामुळे दुरदृष्टी ठेउन दररोज स्नानाची प्रथा नाही.

ऑनलाईन दर्शन

मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम

दैनंदिन कार्यक्रमांचे वेळापत्रक

 • पहाटे
  ५:३० ते ६:३० श्रींची काकडआरती
 • सकाळी
  ७:०० ते ८:०० सनई वादन व भुपाळी
 • सकाळी
  ८:०० ते १०:०० श्रींची मंगल आरती
 • सकाळी
  १०:३० ते १:०० श्रींची महापुजा महान्यास, महाआरती
 • दुपारी
  ३:०० ते ५:०० विविध भजनी मंडळाचे भजन
 • सांयकाळी
  ७:०० ते ८:०० श्रींची शेजआरती
 • रात्री
  ८:०० ते १०:०० किर्तन