मंदिरात साजरे होणारे वार्षिक उत्सव

प्रतिवर्षी चैत्र शु ||१|| प्रतिपदा गुढिपाडवा ते चैत्र शु ||१२|| व्दादशिपर्यंत श्रीराम जन्मोत्सव साजरा होतो गुढीनीक पाडव्याच्या दिवशी सकाळी ९ ते १० मंगल आरती होते वंश परंपरागत पुजाधिकारी पुजारी परिवाराचे मानकरी बुवा , सालकरी बुवा यांच्या हस्ते सपत्नीक काव्यवाचन संकल्प घेउन विधिवत राजोपचारासहीत बोडोपशार पुजा होते प्रभुस मंगल स्नान घालून भरजरी पोषाख चढविण्यात येतो वंशपरंपरागत आसलेले दागिणे अलंकृत केले जातात उत्तम हार फुलांनी शृंगार केला जातो चैत्र शु ||७|| सप्तमीस महाप्रसाद गोडजेवण आयोजित केला जातो या प्रसादास भाविकजन कोसथेचे पण म्हणतात. सर्वच भाविकांना हा प्रसाद मिळावा या हे तूने सर्व त-हेने उत्तम व्यवस्था करण्यात येते. श्रीराम नविच्या दिवशी सकाळी ७ वाजता महापूजे प्रारंभ होतो व सकाळी ९ पर्यंत विधिवत पुजा आटोपून प्रभुस मंगल स्नान घालून भरजरी पोषाख व आलंकार चढविण्यात येतात उत्तम तर्‍हेचे हार फुलांनी शृंगार करण्यात येतो महाव्दार ठीक १२ वा सालकरी बुवाचे रस्ते रामजन्माचा आगरह होतो भाविकांची प्रचंड गर्दी होते. जो तो प्रभुच्या दर्शनाला आसुसलेला आसतो भाविक दर्शन घेउन तृप्त होता. आनंदि होतात धन्य होतात सर्वत्र ढोल नगारे टाळ मृदुंग बँड पथक या मंगल वाद्यांचा गजर होतो. राजाधिराज श्रीरामचंद्र महाराज की जय , जय श्रीराम जय जय राम अशा घोषणांनी परिसर दुमदुमून जातो सर्वत्रच उत्सहाचे वातावरण आसते भर दुपारी बारा वाजता रण रणत्या उन्हात पर्वा न करता भाविक दर्शनास गर्दी करतात व दर्शन घेवून तृप्त होतात शांत होतात रणरणत्या उन्हाचा कोणताही त्रास त्यांच्या चेह-यावर जानवत नाही श्रीराम जन्मानंतर प्रत्येक भाविकास पंजरीचा प्रसाद वाटण्यात येतो असा हा गर्दीचा ओघ रात्रौ ११ पर्यंत कायम सुरू असतो सायंकाळी ८ वासता प्रभुस पुरणाचा अन्नकोटाचा ( ५६ भोग ) नैवैद्य दाखवण्यात येते.

सायंकाळी ५ वाजता रथ मांडवात यतो रथाची आरास करण्यात येते संकल्पना ही की श्रीराम प्रभु भाविक जनांना दर्शन देण्यासाठी रथावर आरूढ आहेत. श्र्वेतवर्णी अश्वरथ ओढित व श्री मारोतीस स्वरथाचे स्वारथ्य करीत अतिशय नयन मनोहर मनाला व डोळ्यांना सुखविनारे लोभस असे दर्शन भाविक अनुभवतो ह्दयात साठउन ठेवतो पुन पुन्हा दृष्टी मागे करून प्रभुचे दर्शन घेऊन तृप्त होतो.

ढोल नगारा झांज्याच्या गजरात सालकरी बुवान कडून आरती होते. यावेळी पुजाधिकारी पुजारी परिवारांतील स्त्रिया अन्नकोटातील नैवैद्य ५६ भोग ताट नेण्यासाठी मंदिरात एका बाजुस उपस्थित असतात पोलिसांन कडून बंदोबस्त अतिशय कडक ठेवला जातो कोणताही अनुचित प्रकार होउ नये म्हणून खूप काळजी घेतली जाते. ९ वाजता रोज आरती होते. परंपरेप्रमाणे रात्रौ ११ चे दरम्यान मंदिर बंद होते.

मंदिरात साजरे होणारे वार्षिक उत्सव

श्री राम जन्मोउत्सवा वेतीरीक्त इतरही उत्सव साजरे केले जातात ते या प्रमाणे.

सकाळी ५:३० वाजता मारूतीयास विधिवत पुजा अभ्यंग स्नान घातले जाते. पोषाख अलंकृत करून सुर्योद्याच्या वेळी साधारणतः ६:३० वाजता श्री हनुमान जन्म साजरा होतो. आरती होते व सर्व भाविकांना पेढे, खडीसाखर , फुटाणे यांचा प्रसाद वाटला जातो.

हनुमान जयंतीच्या दुस-या दिवशी सायंकाळी आरती करून श्री मारूती रायास गोपाल काल्याचा नैवद्य दाखवला जातो. व उपस्थित भाविकांना गोपाळकाला वाटला जातो.

वैशाख शु ||१०|| चतुर्दशिचे सायंकाळी नृसिंह जयंती साजरी केली रत्रौची रोज आरती सायंकाळी ७:१० चे सुमारास सुर्यास्थाचे सुमारास होते आरतीच्या वेळी गुलाल उधळून नृसिंह जन्म साजरा केला जातो. कैरीचे पन्हे व कलींगड याचा नेवैद्य दाखवला जातो व उपस्थित भाविकांना पन्हे व कलींगड याचा प्रसाद दिला जातो. भगवान विष्णूच्या दहा अवतारातील हा चौथा अवतार नृसिंह अवतार नृ म्हणजे नर व सिंह अशा अर्ध मानवि व अर्ध पावशी स्वरूपात अवतार घेतला सिंहाचे तोंड मनुष्याचे शरीर लाल डोळे आणि तीक्ष्ण नखे अशा अवताराने भक्त प्रल्हादाची त्या काळच्या हिरण्यकश्यु राक्षसाच्या छळाला बळी पडणा-या सज्जनांची प्रार्थना ऐकून दृष्ट निर्दालन केल्याची ही स्मृती

भगवान विषणुचा आठवा अवतार श्रावण वध अष्टमी म्हणजे गोकुळ आष्टमी श्री कृष्ण जन्मोउत्सव या दिवशी मथुरेच्या बंदिशाळेत देवकीच्या पोटी जगद उध्दारक श्रीकृष्णाने ऐन मध्येरात्री जन्म धेतला भगवान विष्णच्या दहा अवतारा पैकी हा आठवा अवतार वसुदाने पावसात यमुना ओलांडून त्याला गोकुळात नंदाकडे पोहोचते केले पुढे कृष्णाने कंस चाउनादी राक्षसांना मारून मोठा पराक्रम केला. दृष्टांचे निर्दालन केले लोकांना सुखी केले दुरितांचे तिमीर नष्ट करून सर्वत्र पुण्याचा पसरवला.

श्रावण कृ || ११ || एकादशी ऐवजी या दिवशी श्रीरम प्रभुंना राजोपचारासहीत स्नानांगभुत बोडशोप चार पूजा होते. देवतांना भरजरी पोषाख चढविण्यात येतो.व हार फुलांनी शृंगार करण्यात येतो.रात्रौ ११ वाजता श्रीकृष्ण जन्मानिमीत्त पुराण वाचन होते. व श्रीकृष्ण जन्म ढोल नगारे झांज्यांच्या गजरात साजरा होतो पंजरीचा प्रसाद वाटण्यात येतो.

भाद्रपद शु ||४|| चतुर्थी हा गणेश चतुर्थीचा महान मंगल दिवस गौरी शंकराचा पुत्र श्री गणेश याच्या उत्सवाचा दिवस आहे.श्री गणेशाला आपण मंगलमुर्ती विधाता विघ्नहर्ता असा श्रेष्ठ देव मानतो कोणत्याही कामाचा शुभारंभ गणेश पुजनाने करतो

ह्या दिवशी मंदिराचे आवाराती दक्षिण पश्चिम कोपर्यातील प्राचीन श्री गणेशाला पुजारी परिवाराकडून गणपती अथर्व शिर्षाच्या २१ आवर्तनाने अभिषेक व स्नान घातले जाते. राजोपचारासहीत पूजा केली जाते. दुर्वा फुले हारवाहून व मोदकाचा नेवैद्य दाखवला जातो. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत रोज सायंकाळी आरती होते. भाविकांना पंचखाद्य पेढे व खडीसाखर याचा प्रसाद दिला जातो.सत्यनारायण पूजन केले जाते. अनंत्त चतुर्दशीला उत्सव समाप्ती होते.

अश्विन शु ||१०|| दशमी म्हणजे दसरा म्हणजे विजयादशमी , विजयादशमी म्हणजे साडेतीन शक्तीपिठानपैकी एक मुहूर्त. या मंगल मुहूर्तावर नविन कामांचा शुभारंभ करतात. आजच्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला. कुबेराने रघुराजाच्या कोषागरात सुवर्ण मुद्रांचा पाऊस पाडला दसर्यालाच प्रभुरामचंद्रानी रावनावर स्वारी केली. पांडवांचा वनवास संपल्यावर त्यांनी याच दिवशी शमी वृक्षाचे पुजन केले आणि त्या वृक्षाच्या ढोलित ठेवलेली शस्त्रास्त्रे पुन्हा धारण केली. त्यामुळे या दिवशी शस्त्रपुजा करीतात.

अश्र्विन शु || ११ || एकादशी ऐवजी आज विधिवत राजोपचार पूजा होते. प्रभुस मंगळरनाम घालून भरजरी पोषाख चढविण्यात येतो वंशपरंपरागत असलेले दागिणे अलंकृत केले जातात. उत्तम हार फुलांनी शृंगार केला जातो. रथाची आरास करण्यात येते श्र्वेतवर्णी अश्व रथ ओढित आहेत. व श्री मारोती स्वतः रथाचे सारथ्य करीत आहेत श्रीराम प्रभु भाविकांना दर्शन देण्यास निघालेले आहेत असे लोभस वार्णे मन प्रसंन्न करणारे दर्शन सुख भाविक अनुभवतो सायंकाळी ५ वाजता सालकरी बुवा पूजा आरती करून श्रीच्या भोगमुर्ती व पासुका चांदीच्या पालखीत ठेवतात. व श्रीराम प्रभु सिमोल्घंनाला निघतात चांदीच्या पालखीत दिव्याची भव्य रोषणाई केलेली आसते. पट्टेवाला श्री वर चौरी ढाकीत असतो पाखीपुढे ढोल नगात झांज तसेच बँड पथक यांचा गजर सुरू असतो. हजारोच्या संख्येने भाविक श्रीच्या पादुकांचे व श्रीचे भक्तीभावाने दर्शन घेत असतात. दर्शन घेण्यास स्पर्श करण्यास कोनासही मज्जाव नाही स्पश्य अस्पृशय लहान मोठा उच निच स्त्रि पुरूष असा भेदभाव नाही सर्वांनी भक्तीभावाने दर्शन घ्यावे व तृप्त व्हावे ,प्रसन्न व्हावे रामनामाचा गजर सुरू असतो. भाविकांच्या उत्सवाला उधान आलेले आसते ही सिमोलंघ्नाची मिरवणूक श्रीराम मंदिर दक्षीण महाद्वारे निघून पूर्व महाद्वारात येते सितागुफा पाथरट लेन गुरूद्वारा लक्ष्मण पूल मुंबई आग्रा रोड मांजिवर पंचवटी डेपोच्या तिथे पोहोचतो पूर्वापार चालत आलेल्या विशिष्ट जागेवर शमी व़ृक्ष रोवलेला असतो व पूजेचा परिसर मंडपाणे सजविलेला असतो. पूर्वी ही जागा म्हणजे पंचवटी भागाची हद्द वेस म्हणून ओळखली जात असे या दिवशी विधिवत मंत्राच्या गजरात शमी पूजन केले जाते. शमी व आपट्याची पाणे लुटून एकामेकांना वाटली जातात श्रीना वाहिली जातात येथून पालखी माघारी फिरते गणेश वाडी, वाघाडी पूल, विठ्ठल मंदिर, सरदार चौक, मुठे गल्ली, शनि मंदिर, पुणे विद्यार्थी गृह मार्गाने श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाज्यास येतो जागोजागी चौका चौकात भाविकांनकडून श्रीचे दर्शन घेतले जाते. अमाप जनसमुदाय श्रीरामांचे दर्शन धेत असतो. पालखीपुढे फटाक्यांची आतिषबाजी सुरू आसते. भाविक आनंदाने बेहोष झालेले असतात.रामनामाच्या गजरात तल्लीन झालेले असतात. अशी ही विजयादशमीची मिरवणूक पूर्व महाद्वारात येते. तेथे सुहासिनिनकडून श्रींचे ओक्षण केले जाते. आरती झाल्यावर पालखी मंदिरात येते. मंदिरात फटाक्यांची आतिषबाजि केली जाते. पूजा आरती केली जाते. भाविकांना पिठी साखर प्रसाद देण्यात येतो. अशा त-हेने श्रीराम प्रभुंच्या सिमोल्लंघनाचे पालखी मिरवणूकिची सांगता होते.

अश्र्विनातील पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा शरद पौर्णिमा या मध्यरात्री लक्ष्मी पृथ्वीवर संचार करते इंद्रदिदेव भुतलावावर येवून सर्वत्र फिरत असतात ते को जागर्ति असा प्रश्न विचारून जे लोक जागे असतील त्यांच्यावर कृपा करून त्यांना द्रव्यादी ऐश्वर्य देतात. अशी श्रध्दा आहे. अशा या कोजागिरीच्या रात्री मंदिरात रात्रौ. ११ वा. पुराण वाचन होते आरती होते.आटवलेल्या दुधाचा नैवद्य दाखविला जातो.व आरतीनंतर सर्वांना सुधाचा प्रसाद देण्यात येतो.

दिपावली निमित्ताने गोवत्स व्दादशी ( वसुबारस ) पासून कार्तीक पौर्णिमा ( त्रिपुरी पौर्णिमा ) पर्यंत मंदिरावर भव्य रोषनाई करण्यात येते नरक चतुर्दशी या दिवशी पहाटे अभ्यंग स्नानाचे महत्व आसते. मंदिरातही श्रीराम प्रभुंना पाहाटे अभ्यंग स्नान घातले जाते या दिवशी दैनंदिन काकड आरती सकाळी ५:३० वाजता विधिवत राजोपचार सहीत पूजा होते. प्रभुंना सुहासिक तेल उटने लावले जाते व मंगल स्नान घातले जाते तदनंतर सुवासिनी प्रभुंना ओक्षण करीतात नंतर भरजरी पोषाख चढविण्यात येतो वंशपरंपरागत असलेले दागिने अलंकृत केले जातात. दिवाळीच्या फराळाचा नैवेद्य दाखवला जातो. प्रभुंच्या स्नानाच्या वेळी फटाके वाजविले जातात कलात्मक रांगोळी काढली जाते कार्तीक कृ ||११|| एकादशी ऐवजी आज मूर्ती स्नान घातले जाते. सायंकाळी कलात्मक रांगोळी काढून समया लावून पणत्या लाउन दिपोत्सव साजरा केला जातो.

अश्र्विन वद्य अमावश्या हा लक्ष्मी पूजनाचा दिवस या दिवशी संध्याकाळी मंदिरात शेज आरतीच्यावेळी विषेश पुजा करण्यात येते. पुजारी परिवारातील सर्वजन आपआपले घरातील लक्ष्मी सोबत लाह्या बत्तासे धने गुळ सक्षिणा यासह मंदिरात आणून ठेवितात मंदिरात श्री हनुमान समवेत लक्ष्मीसहीत श्रीरामचंद्रदेवता स्वरूपण श्री लक्ष्मी कुबेर देवता यांचे पजन होते पुरणाचा नेचैद्य दाखवला जातो आरती होते सर्वांना लाह्या बत्तासे पेढा यांचा प्रसाद दिला जातो मंदिरात सर्वत्र कलात्मक रांगोळी काढली जाते समया पणत्या लावून दिपोउत्सव साजरा केला जातो.

मार्गशिर्ष पौर्णिमा म्हणजे दत्त जयंती नगद गुरू श्री दत्तात्रेय यांचा जन्मदिवस आज सायंकाळी सुर्यास्ताच्या समयी मंदिरातील औदुंबर वृक्षाजवळील दत्त पादुका व दोन देवळातील दत्त पादूका येथे दत्त जन्म साजरा केला जातो. सुर्यास्ताच्या समयी गुलाल उधळून आरती केली जाते भाविकांना प्रसाद दिला जातो.

सूर्य धनु राशित प्रवेश करतो तेथून सुर्य मकर राशित प्रवेश करतो तोपर्यंतचा काळ हा धर्नमास म्हणून ओळखला जातो. साधारणता डिसेंबर जानेवारी हा कालावधी संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी आसते तो दिवस धर्नुरमास समाप्तीचा हा काळ थंडीचा असतो वातावरणातील थंडीचा त्रास होऊ नये म्हणून उष्णतावर्धक पदार्थांचा नैवेद्य करून देवतेस दाखवावयाचा तो पण अगदी सकाळी ५:30 वासता काकड आरतीचे वेळी नैवेद्यातीन विशिष्ट पदार्थ गुळाच्या पोळ्या मुगाची खिचडी तिळ लावलेली बाजरीची भाकरी, मुगाचे लाडू वांग्याचे भरीत लोणी इत्यादी पदार्थांचा समावेश होतो त्यावर्षाचे सालकरी बुवा पुजारी परिवाराकडून हा नैवेद्य सकाळी ५:30 तयार केला जातो व भाविकांना गरम गरम मुगाच्या खिचडीचा प्रसाद वाटण्यात येतो त्यासाठी पुजारी परिवाराला सकाळी ३:३० वाजता उठून सर्व करावे लागते.

होळी पौर्णिमे नंतर येणारी पंचमी म्हणजे फाल्गुन ||५|| पंचमी म्हणजेच रंगपंचमी हा वसंतोत्सवातील मोठा शुभ दिवस मानला जातो. आजचे दिवशी प्रभुचे अंगावर शुध्द केशराचा रंग उडविला जातो व गुलाल उधळला जातो. श्रीखंडाचा नैवेद्या दाखवला जातो भाविकांना श्रीखंड प्रसाद म्हणून देण्यात येते रंगपंचमी निमित्त प्रभुंना विशिष्ट प्रकारचा पोषाख परिधान केला जातो. फालगुन शु ||११|| एकादशी या दिवशी स्नानानंतर पांढराशुभ्र पोषाख परिधान केला जोतो श्रीराम व लक्ष्मण यांना पांढरे फेटे पांढरे पांढरे झगे पांढरे सदरे पांढरे उपरणे तसेच सीता माईना पांढरी शुभ्र साडी चोळी अशा पोषाख असतो केवळ वर्षातुन एकदाच हा पांढरा शुभ्र पोषाख परिधान करण्यात येतो या पोषाखावर केशराचा रंग व गुलालाची उधळण खुलून दिसते.

ऑनलाईन दर्शन

मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम

दैनंदिन कार्यक्रमांचे वेळापत्रक

 • पहाटे
  ५:३० ते ६:३० श्रींची काकडआरती
 • सकाळी
  ७:०० ते ८:०० सनई वादन व भुपाळी
 • सकाळी
  ८:०० ते १०:०० श्रींची मंगल आरती
 • सकाळी
  १०:३० ते १:०० श्रींची महापुजा महान्यास, महाआरती
 • दुपारी
  ३:०० ते ५:०० विविध भजनी मंडळाचे भजन
 • सांयकाळी
  ७:०० ते ८:०० श्रींची शेजआरती
 • रात्री
  ८:०० ते १०:०० किर्तन